Employee Latest News : मोठा निर्णय! या राज्यातील कंत्राटी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचे मिळाले मोठे गिफ्ट; मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्वाचे निर्णय

Employee Latest News : सरकारी कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या संदर्भात दोन मोठे निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतले आहे, दिनांक 18 जुलै 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्यात भरघोस वाढ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याबाबत मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे, सविस्तर बातमी वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

Employee Latest News

Government Employee DA Hike : दिनांक 18 जुलै 2023 रोजी मध्यप्रदेश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेल्या महागाई भत्त्याच्या दरात 4% टक्क्याची वाढ करण्यात आली असून, दिनांक 1 जानेवारी 2023 पासून 42% वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच महागाई भत्ता वाढ ही राज्यातील चौथा, पाचवा आणि सहाव्या वेतन आयोग वेतनश्रेणी लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे. 

महागाई भत्ता वाढीचा लाभ हा जुलै 2023 च्या वेतनासोबत मिळणार असून, 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या कालावधीतील थकबाकीची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये 3 समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारचे मिळाले मोठे गिफ्ट

Contractual Employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारचे मिळाले मोठे गिफ्ट, मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राज्यातील सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची घोषणा दिनांक 4 जुलै 2023 रोजी कंत्राटी कर्मचारी अधिवेशनात केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष दिनांक 18 जुलै 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याचा लाभ राज्यातील जवळपास 1.5 लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश - कंत्राटी कर्मचारी धोरण PDF डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी भरती मध्ये 50 टक्के आरक्षण, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), आरोग्य विमा योजना, अनुकंपा नियुक्तीचा लाभ, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचा लाभ देण्याबाबत मा. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी दिनांक 4 जुलै 2023 रोजी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यास प्रत्यक्ष मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सविस्तर येथे वाचा..

अखेर! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची तिसरी यादी जाहीर

कंत्राटी कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळणार पहा
एस टी महामंडळाचा मोठा निर्णय
सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? पहा.

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post