ITI Admission Online Registration : आयटीआय प्रवेशासाठी 154932 जागा; या तारखेपर्यंत मुदत; जाणून घ्या ऑनलाईन नोंदणीची पूर्ण प्रक्रिया...

ITI  Admission Online Registration : आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून 2023 पासून सुरू झाली आहे, ऑनलाईन प्रवेश नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही 11 जुलै 2023 पर्यंत असून, यावर्षी ITI Admission 2023 करिता एकूण 4 फेऱ्या असणार आहे, राज्यत एकूण 85 व्यवसाय (कोर्स) उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे, तेव्हां ITI साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी लवकरात लवकर (दि.11) जुलै पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, ऑनलाईन नोंदणीची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया..

आयटीआय प्रवेशासाठी 154932 जागा

ITI Admission Online Registration

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय (कोर्स) उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. 

जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.

आयटीआयसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून 2023 पासून सुरू करण्यात आलेली असून, दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

आयटीआय प्रवेश प्रक्रियेतील टप्पे व प्रवेशाचे वेळापत्रक

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक 2023

 • ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी - 12 जून 2023 ते 11 जुलै 2023
 • प्रवेश अर्ज निश्चित करणे - 19 जून  2023 ते 11 जुलै  2023
 • प्राथमिक गुणवत्ता यादी - 13 जुलै 2023
 • अंतिम गुणवत्ता यादी - 16 जुलै 2023
 • पहिली प्रवेश फेरी - 20 जुलै 2023
 • दुसरी प्रवेश फेरी -  31 जुलै  2023
 • तिसरी प्रवेश फेरी -  9 ऑगस्ट 2023
 • चौथी प्रवेश फेरी - 21 ऑगस्ट 2023 ते 24 ऑगस्ट 2023 
 • संस्था स्तरावरील समपुदेशन फेरी - 27 ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. [माहिती पुस्तिका डाउनलोड करा]

अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता समकक्ष पदानुसार मिळणार वेतन
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

आयटीआय ऑनलाईन प्रवेश अर्ज

 1. ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
 2. प्रवेश अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल. 
 3. नोंदणी क्रमांक व User ID चा वापर करुन उमेदवारांनी त्यांच्या कडील दस्तऐवजाच्या आधारे प्रवेश अर्जात संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. 
 4. प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यावर सर्व माहिती बरोबर असल्याची पुनच्छ: खात्री करुन घ्यावी.
 5. प्रवेश अर्जातील माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरुपात जमा करावे. [ऑनलाईन अर्ज येथे करा]

MPSC चे मोफत प्रशिक्षण येथे पहा
YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post