UDISE PLUS 2022-23 मध्ये दिव्यांग CWSN मुलांची माहिती कोठे भरावी ? | दिव्यांग प्रकार कोड नंबर

राज्यामधील सर्व शाळांकडून शाळा तपशील, विद्यार्थी संख्या दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण इ. माहिती संकलित करण्यात येते व सदर माहितीचा उपयोग शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता केल्या जातो. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या अंमलबजावणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते.


udise-plus-cwsn-code-marathi

{tocify} $title={Table of Contents}

UDISE PLUS 2022-23 | CWSN विद्यार्थ्यांची माहिती

यु-डायस प्लस (U-DISE Plus) चा फुल फॉर्म Unified District Information System for Education असा आहे. तर CWSN चा Full Form Children with special needs असा आहे. म्हणजेच मराठीत अर्थ विशेष गरजा असणारे बालके असा होता.

➡️  UDISE Plus म्हणजे काय ? देशातील व राज्यातील UDISE क्रमांक असणारी पहिली शाळा 

यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे पुढील शैक्षणिक वर्षाचे  वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी यु-डायस प्लस माहितीची आवश्यकता असते. जेणेकरून त्याचा लाभ विद्यार्थी व शिक्षक प्रशिक्षण तसेच इतर शासकीय योजना यामध्ये समाविष्ट असतात. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी , राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), School Education Qulity Index (SEQI) निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्यासाठी UDISE Plus माहिती चा उपयोग केला जातो. 

यावर्षी यु-डायस प्लस प्रपत्रामध्ये बदल झाला असून, यु-डायस प्लस प्रणाली मध्ये यंदा दोन टप्प्यामध्ये माहिती संगणीकृत करण्यात येत आहे.

UDISE PLUS 2022-23 मध्ये दिव्यांग CWSN मुलांची माहिती कोठे भरावी ?

UDISE Plus 2022-23 मध्ये ४ भागामध्ये माहिती भरण्यात येत आहे. यामध्ये CWSN (दिव्यांग) संदर्भात माहिती कोठे-कोठे भरायची आहे? आणि कोणती माहिती भरणे अपेक्षित आहे? याविषयीची माहिती पाहूया.

महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात येत आहे.

भाग-१ Section 1A- Basic School Profile (Location, Management, Medium of Instruction etc)

1.44 Details of visits to the school during the previous academic year:
(a) Number of Academic inspections: (शाळा तपासणी संख्या)
(b) Number of visits by CRC Coordinator: (केंद्रप्रमुख यांच्या शाळा भेटी संख्या)
(c) Number of visits by Block level officer(BRC/BEO): (गटशिक्षणाधिकारी, गटसमन्वययक, विस्तार अधिकारी, अभियंता , विषयसाधनव्यक्ती, विशेष तज्ञ - समावेशित शिक्षण (IED), विशेष शिक्षक यांच्या एकत्रित शाळा भेटी संख्या)
(d) Number of visits by District/State level officers: (जिल्हा/राज्यस्तरीय -ZP, DIET, SCERT, MPSP, OTHER अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित शाळा भेटी संख्या)

Section 2- Physical Facilities, Equipment, Computer and Digital initiatives

2.15 Whether School has special educator? (1-Dedicated, 2-At cluster level, 3-No)
शाळेत विशेष शिक्षक आहेत का? तर विशेष शाळांसाठी 1-Dedicated हा पर्याय येईल.
बहुतेक सामान्य शाळांसाठी 2-At cluster level हा पर्याय येईल. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक केंद्रासाठी विशेष शिक्षक (मोबाईल टीचर) आहेत. (अपवाद एखाद्या ठिकाणी नसेल तर 3-No हा पर्याय येईल.)

Section 3: Teaching and Non-Teaching Staff

3.3.28 Whether using special resources for education of Children with
special needs (CWSN)? (1-Yes, 2-No)
CWSN मुलांच्या शिक्षणासाठी विशेष संसाधने (साहित्य ) वापरण्यात येतात का?
उदा. लार्ज प्रिंट- मोठ्या अक्षरातील पुस्तके , ब्रेल बुक इ. (याव्यतिरिक्त साहित्याचा वापर होत असल्यास 1-YES हा पर्याय नोंदवा)

UDISE PLUS मध्ये दिव्यांग CWSN मुलांची माहिती कोठे भरावी ?

SECTION 4: STUDENT PROFILE

PART B: STUDENT DETAILS
4.1 GENERAL INFORMATION OF STUDENT (GENERAL PROFILE)

UDISE PLUS 2022-23 मधील हा महत्वाचा बदल आहे. यंदा शाळेतील सर्वच मुलांची संपूर्ण माहिती (STUDENT DETAILS) भरायची आहे. त्यामध्येच 
📌 4.1.17 Whether CWSN? (Yes-1, No-2) :
If Yes, (a) Type of impairment (code)**
नावाचा एक प्रश्न आहे की, सदर विद्यार्थी दिव्यांग आहे का? इथेच CWSN/दिव्यांग मुलांसाठी Yes-1 हा पर्याय निवडून दिव्यांग २१ प्रकारातील कोड नंबर टाकायचा आहे. Type of impairment (code)

दिव्यांग २१ प्रकार कोड नंबर खालीलप्रमाणे (Type of impairment (code)

 
दिव्यांग प्रकार  कोड नंबर 
Blindness - अंध    1
Low-vision-अंशतः अंध (दृष्टिदोष)             2
Hearing Impairment - कर्णबधिर 3
Speech and Language disability - वाचादोष  4
Locomotor Disability- अस्थिव्यंग            5
Mental Illness- मानसिक आजार 6
Specific Learning Disabilities - अध्ययन अक्षमता 7
Cerebral Palsy - सेरेब्रल पालसी (मेंदूचा पक्षाघात)             8
Autism Spectrum Disorder - स्वमग्न 9
Multiple Disabilities including deafblindness - बहुविकलांग 10
Leprosy Cured persons - कुष्ठरोग         11
Dwarfism- बुटकेपणा 12
Intellectual Disability- मतिमंद 13
Muscular Dystrophy -अविकसित मांसपेशी        14
Chronic Neurological conditions- मज्जासंस्थेचे तीव्र आजार 15
Multiple Sclerosis - मेंदूतील चेतासंस्था संबंधी आजार 16
Thalassemia- रक्ता संबंधी कॅन्सर           17
Hemophilia- रक्तवाहिन्या संबंधित आजार 18
Sickle Cell disease - रक्ता संबंधी रक्ताचे प्रमाण कमी 19
Acid Attack victim - acid हल्लाग्रस्त पीडित            20
Parkinson's disease - कंपावत रोग 21उदा.
📌 1 हा Blindness (अंध) प्रवर्गाचा कोड आहे.
📌 2- हा Low-Vision (अंशतः अंध) प्रवर्गाचा कोड आहे.
📌 13- हा Intellectual Disability म्हणजेच बौद्धिक अक्षमता (मतीमंद) प्रवर्गाचा कोड आहे.
CWSN/दिव्यांग मुलांची माहिती भरताना मतीमंद या प्रवर्गातील होणारा गोधळ तो म्हणजे 
Mental Illness आणि Intellectual Disability यामध्ये होतो.
मतीमंद (बौद्धिक अक्षम) प्रवर्गातील विद्यार्थ्यांची नोंद ही Intellectual Disability या प्रवर्गात नोंद करणे आवश्यक आहे. (कोड नंबर-13)

📌 Mental Illness म्हणजे मानसिक आजार यामध्ये मतीमंद प्रवर्गातील विद्यार्थ्यांची नोंद करण्यात येऊ नये.

दिव्यांग मुलांच्या सेवा- सुविधा माहिती 

4.3 FACILITY AND OTHER DETAILS OF THE STUDENT
दिव्यांग सेवा-सुविधा


भाग- ४ मध्ये ४.३ मध्ये (अपंग) दिव्यांग समावेशित शिक्षण अंतर्गत पुरवठा केलेले साहित्य साधने , सेवा सुविधांची माहिती भरावयाची आहे. त्यामध्ये खालील सुविधा प्रकार आहे.

1. Brail Books

ब्रेल बुक्स म्हणजे अंध मुलांना पुरविण्यात आलेले ब्रेल ची पुस्तके मिळाली असतील तर याबाबतीत ची माहिती या कॉलम मध्ये भरण्याची आहे.

2. Brail Kit

ब्रेल किट म्हणजे अंध विद्यार्थ्यांना लिहण्यासाठी ब्रेल पाटीचे साहित्य किट मिळाले असेल तर याची नोंद इथे करावी.

3. Low Vision Kit

अंशतः अंध म्हणजेच ज्यांना कमी दिसते किंवा एकाच डोळ्याने दिसते. अशा मुलांना मिळालेल्या लो व्हिजन किट ची माहिती येथे अपडेट करावी.

4. Hearing Aid

कर्णबधिर Hearing Impairment मुलांना कानाने ऐकू येण्यासाठी कानाचे मशीन दिले जाते. याची माहिती येथे भरावी.

5. Braces

ब्रसेस हे सांध्यांना आधार देणारे पट्टे असतात.

6. Crutches

क्रचेस म्हणजेच कुबड्या उभं राहण्यासाठी , चालण्यासाठी चे सपोर्टटिव्ह साधन

7. Wheel Chair

व्हीलचेयर ही दोनचाकी सायकल असते. सेरेब्रल पालसी , बहुविकलांग मुलांच्या साठी व्हीलचेयर अधिक फायदेशीर असते.

8.Tri-Cycle

तीनचाकी सायकल विद्यार्थी स्वतः ही सायकल चालवतो.

9. Caliper

कॅलिपर हे पायाला सपोर्ट करणारे बूट आहे.

10. Escort

मदतनीस भत्ता

11. Stipend

प्रोत्साहन भत्ता

12. Transport

प्रवासभत्ता

13. Other

इतर सुविधा संख्या नोंद करावे.

दिव्यांग मुलांची तपासणी - 4.3.3

4.3.3 Whether child has been screened for Specific Learning Disability (SLD)(Yes-1, No-2): 
अध्ययन अक्षम मुलांची तपासणी करण्यात आहे का?


If Yes-1, 4.33 (a) Specify the type of SLD: (Dysgraphia-1, Dyscalculia-2, Dyslexia-3):
असल्यास अध्ययन अक्षम मधील कोणता प्रकार आहे.

4.3.4 Whether child has been screened for Autism Spectrum Disorder (ASD)? (Yes-1, No-2)
स्वमग्न मुलांची तपासणी करण्यात आली आहे का?

4.3.5 Whether child has been screened for Attention Deficit
Hyperactive Disorder (ADHD)? (Yes-1, No-2)
अतिचंचल मुलांची तपासणी करण्यात आली आहे का?

अशा पद्धतीने UDISE PLUS 2022-23 फॉर्म मध्ये दिव्यांग CWSN मुलांची माहिती अचूक भरण्यात यावी जेणेकरून दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या सेवा-सुविधांचा लाभ घेता येईल.


सरकारी योजना

>> अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

>> संजय गांधी निराधार पेन्शन योजना | Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

>> सरकारी योजना

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        


Previous Post Next Post